जळगाव गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा सेवा उद्या बुधवारीपासून पुन्हा सुरु होणार आहे. तर अहमदाबाद विमान सेवेसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, जळगाव-मुंबई विमानसेवा सेवा सुरु होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
तांत्रिक कारणामुळे मागील गेल्या १५ दिवसापासून जळगाव-मुंबई विमानसेवा सेवा बंद करण्यात आलेली होती. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती, परंतु आता उद्यापासून ही सेवा पुन्हा सुरु होणार आहे. तर अहमदाबाद विमान सेवेसाठी 15 मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. ट्रु-जेट कंपनीच्या व्यवस्थापकीय समस्या व एअरक्राफ्ट दुरुस्तीच्या कारणाने सेवा 7 फेब्रुवारीपासून बंद आहे.
कंपनीतर्फे आरसीएस उपक्रमांतर्गत देशात 26 विमान तळांवर सेवा दिली जाते. या सर्व ठिकाणी विमानसेवा बंद ठेवण्यात आली मात्र आता ती सुरू बुधवारपासून सुरू होणार असल्याची माहिती कंपनीचे राष्ट्रीय विपणन प्रमुख नैमिश जोशी म्हणाले.