५ हजाराची लाच कोतवालास भोवली

0
21

जळगाव प्रतिनिधी 
शेतीच्या सातबारा उतार्‍यावरील तक्रारदाराच्या बहिणीचे नाव कमी करून देण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना यावल तालुक्यातील मालोद येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास जाळ्यात अडकला आहे. हमीद जहांगीर तडवी (रा.किनगाव, ता.यावल) असे लाचखोर कोतवालाचे नाव असून त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. मालोद येथील तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत असलेला कर्मचारी जहांगिर तडवी याने तक्रारदाराकडून ५ हजाराची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार याने लाचलुचपत विभागाला तक्रार दिली होती. लाचलुचपत विभागाने मंगळवार २२ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील किनगाव मंडळाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एका स्टेशनरी दुकानासमोर तक्रारदाराकडून ५ हजाराची लाच स्विकारतांना कोतवाल हमीद तडवी याला रंगेहात पकडले आहे. सदर कारवाईमुळे किनगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे. मात्र लाच घेण्यामागील कारणाची अधिकृत माहिती मिळाली नव्हती. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here