जळगाव प्रतिनिधी
शहरातील एका कॉलनीत प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली. त्यात तरुणाची गंभीर दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी दुपारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीनुसार, रविवारी रात्री धरणगाव तालुक्यातून जळगाव शहरातील घरी आल्यावर मुलाला किराणा दुकानावर झाला. दूध घ्यायला पाठविले असता तेथून परत येत असताना सम्राट कॉलनीत एका तरुणाने रस्त्यात अडवून तुझे माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत, या कारणावरून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली असता मुलाला काही लोकांनीच शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ज्या मुलावर हल्ला झाला तो फुले मार्केटमध्ये कापड दुकानावर कामाला आहे. त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत, हे त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीतही म्हटले आहे.