जामनेर /प्रतिनिधी _ १९ फेब्रुवारी रोजी श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरातील सुवर्ण कार समाज बांधवांच्या वतीने समाज कार्यालयात मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस अध्यक्ष. प्रदीप अशोक विसपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पादुका पूजन खजिनदार नरेंद्र पद्माकर सोनार यांच्या हस्ते तर दीप प्रज्वलन . किशोर दुसाने यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम साजरा सुद्धा करण्यात आला,या वेळी समाजाचे सचिव . दिपक बाविस्कर, जेष्ठ सदस्य. सुधाकर सराफ,डॉ. मनोज दादा विसपुते,विनायक विसपुते, छोटु विसपुते , रमेश दंडगव्हाल, सुरेश दुसाने, देवानंद सोनार, दिलीपसेठ भामरे, दिलीप सोनार,संदीप विसपुते, सुभाष मोरे, नंदकिशोर विसपुते, मुकेश दंडगव्हल, गंगादर गायकवाड, अविनाश सराफ, शांताराम सराफ,कैलासविसपुते, संतोष सराफ, जयंत देवरे , कृष्णा सोनार, अनिल सोनार,संजय देवरे तसेच महिला सदस्य मालती सोनार,डॉ. स्वाती विसपुते, संगीता विसपुते, मिनाक्षी दुसाने लीना दुसाने,वैभवी विसपुते, कांचन विसपुते, बाविस्कर यांच्यासह सर्व जेष्ठ महिला मंडळ उपस्थित होते.