विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील सोयगाव व सावळदबारा परिसरात यंदा कापसाचे भाव १० हजार ५५० रुपयांवर पोहचले,तर एप्रिल महिन्यात कापूस १२ हजरांवर जाण्याची शक्यता असल्याचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण माहिती दिली आहे यंदा कापशाचे भाव तेजीत आहेत. कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळत आहे. कापसाचे दर कायम तेजीत राहतील अशी शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. मागच्या काही दिवसांपासून कापसाचे दर 10 हजारांवर थांबले आहेत, तरीही भविष्यात 12 हजारांवर कापूस दर जाणार असल्याचा अंदाज आहे.माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांच्या अंदाजानुसार कापसाचे दर 12 वर जाण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात दर तेजीत राहतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 29 मी पेक्षा अधिक लांबी असलेल्या व कापसाचा 74 टक्के पेक्षा जास्त असल्यास कापसाला चांगले भाव ठरतात. तसेच कापूस विकताना कापसामध्ये कचरा राहू नये याची देखील शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागतात. 3 % पेक्षा कचरा कमी असावा, अशी काळजी घेतल्यास कापसाला दर चांगला मिळतो.
“”20 फेब्रुवारी सायंकाळी कापसाचे भाव- 19 फेब्रुवारी रोजी कापसाला १० हजार ३०० रुपये भाव मिळाला तर फेब्रुवारी रोजी कापसाचा दर १० हजार ५०० वर पोहचला.तर २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कापसाला १० हजार ५५० तर सर्व साधारण दर ९ हजार ४०० रुपये व कमीतकमी दर भाव ७ हजार ९०० भाव सावळदबारा परिसरात मिळाला आहे.
व्यापारी ः मो.रफिक मो.छब्बिर (कादरिया टेडर्श) सावळदबारा ता.सोयगाव.