जळगाव : प्रतिनिधी
येथील शिवतीर्थ मैदानावर जाणता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक सुनील खडके यांच्या संकल्पनेतून युवा पर्व फाऊंडेशन च्या वतिने 2100 दिव्यांनी शिवरायांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आशिष शिवाजी सोनवणे यांनी रेखाटली व त्यांना युवा पर्वच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. प्रतिमा साकारण्यासाठी 40 किलो रांगोळी,2100दिव्यांचा वापर झाला तसेच 60100 फुट इतकी भव्य दिव्य अशी हि कलाकृती होती अशी कलाकृती साकारण्याचा उपक्रम प्रथमच शहरात राबविण्यात आला. कोरोनाच्या कठीण काळातून आपण सावरलो त्यानंतरचा सकारात्मकता दर्शविण्यासाठीचा हा उजेड होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, बापूसाहेब पाटील, दिलीप माहेश्वरी, दिलीप चाळसे सर, सचिन धांडे, किशोर सोनवणे, उद्योजक चंदन महाजन आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी नगरसेवक सुनिल खडके व युवा पर्व फाऊंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.