जळगांव (प्रतिनिधी) मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आदर्श शिक्षक श्री. प्रवीण धनगर सर यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
या वेळी मौलाना आझाद अल्पसंख्याक फौंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, सपना श्रीवास्तव, मनोज भालेराव सर, सागर पाटील सर, मोनाली कुमावत आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.