केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय जळगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची महिमा भाषणे , गीते , पोवाडे सादर करून स्पष्ट केली.
प्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.