छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त युवाशक्ती फाउंडेशन आयोजित तसेच महावीर क्लासेसच्या सहकार्याने रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी “पावनखिंड” हा चित्रपट आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे ‘मोफत’ दाखविण्यात येणार आहे.
या साठी 14 ते 20 वर्ष वयोगटातील इच्छुक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित परीक्षा देण्यासाठी शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 4.00 वाजता महावीर क्लासेस, गणेश कॉलनी, जळगाव येथे यावे अशे आव्हान युवाशक्ती फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.
सदर परीक्षा 30 मिनिटाची राहणार असून या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 20 प्रश्न विचारण्यात येणार आहे. एम.सी.क्यू. (Mutliple Choice Question) पद्धतीने परिक्षा आयोजित केली जाणार आहे. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 51 विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सविस्तर इतिहासाची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी तसेच आदर्श शिव जयंती साजरी व्हावी या हेतूने सदर आयोजन करण्यात आले आहे.