बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच कार्यकर्ते आणि सामान्यांशी जोडलेले असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज तब्बल 14 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले . असं असलं तरी अजित पवार यांनी नागरिकांच्या भेटीसाठीही स्वतंत्र वेळ दिल्याने सर्वच स्तरातून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे .
आपल्या मतदारसंघासह परिसरातील जनतेला कामानिमित्त मुंबई पुण्याला यावं लागू नये यासाठी अजित पवार आपला एक दिवस बारामतीसाठी देतात. 1991 पासून नागरिकांसाठी अजित पवार वेळ देतात. त्यामुळंच इथली जनता पवार कुटुंबियांवर भरभरुन प्रेम करत असल्याचं ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर सांगतात.
इथं येणाऱ्या नागरिकांच्या समस्येचं निराकरण झालं की नाही याबद्दलही आढावा घेतला जातो. आजही अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन अजित पवारांना भेटले. यावेळी अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने ही कामं तात्काळ मार्गी लावली. त्यामुळंच इथं विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर एक समाधान पहायला मिळते .
