जामनेरात शिवजयंती निमित्त मोटार सायकल रॅलीला परवानगी मिळावी व शिवप्रेमींना दिलेली हद्दपारीची नोटीस मागे घ्यावी यासाठी प्रशासनाला राष्ट्रवादी कांग्रेस चे निवेदन.

0
30
जामनेर (प्रतिनिधी):- उद्या दि.१९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून छत्रपतींची जयंती राज्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून शहरातून दरवर्षी प्रमाणे मोटार सायकल भगवा रॅलीचे आयोजन शिवप्रेमीं तर्फे करण्यात येते. मात्र कोरोना नियमांमुळे प्रशासनाने भगवा रॅली दरम्यान कोरोना नियमांचे उल्हंगण होऊन शांततेचा भंग होईल म्हणून काही  शिवप्रेमींवर गुन्हे दाखल करून हद्द पारीची नोटीस बजावली आहे. शिवप्रेमीं च्या भगव्या रॅलीला परवानगी मिळावी व शिवप्रेमींवर दाखल केलेले गुन्हे व हद्दपारीची नोटीस मागे घ्यावे यासाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने जामनेर तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील,शहर अध्यक्ष
पप्पू पाटील, ओ बी सी सेलचे तालुका अध्यक्ष राजेश नाईक,युवक शहर अध्यक्ष विनोद माळी,सरचिटणीस भारत राजपूत,उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे,मोहन चौधरी,दत्तात्रय नेरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here