ज्येष्ठ गायक- संगीतकार बप्पी लहिरी यांचं मुंबईत निधन

0
53

मुंबई : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बाॅलिवुडमध्ये शोककळा पसरली आहे.

बाॅलिवुडचा पहिला राॅक स्टार म्हणून बप्पीदा ओळखले जायचे. ‘डिस्को किंग’ म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांना सोन्याचे दागिने घालायची आवड होती. गळ्यात जाड सोन्याच्या चेन्स, बोटांमध्ये सोन्यांच्या अंगठ्या घालणं त्यांना आवडत होते. अंगावरील दागिन्यांमुळेही त्यांचा खास लूक नेहमी चर्चेचा विषय ठरायचा.

बप्पीदा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीमध्ये झाला होता. त्यांना दोन मुले आहेत.
नुकतेच ६ फेब्रुवारी २०२२ रोजी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर गायक बप्पी लहरींचे झाल्याने बाॅलिवूडला मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here