शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करिता विद्यार्थ्यांच्या मुलाखती

0
27

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव तसेच सेवासंवर्धन संस्था, जळगाव ह्यांच्या संयुक्त विद्यमाने अंतिम वर्ष अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) व पदवी (डिग्री) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यासाठी मेगा परिसर मुलाखती (कॅम्पस प्लेसमेंटचे) आयोजन करण्यात आले होते.

सदर नोकर भरती करिता औरंगाबाद येथील धूत ट्रान्स्मिशन ह्या बहुराष्ट्रीय कंपनीला आमंत्रण देण्यात आले होते. धूत ट्रान्स्मिशन ही कंपनी टू व्हीलर, थ्री व्हीलर व फोर व्हीलर च्या वायर हार्नेसिंगचे उत्पादन बनविणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेण्याकरिता कंपनीतील मानव संसाधन विभागातील व्यवस्थापक शुभम पाटी, वृषभ आवळे महाविद्यालयास भेट दिली. त्यांनी कंपनीचे उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, मशीन्स व कामे करण्याच्या पद्धतीबद्दल विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. त्यांचे स्वागत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस पी मोहनी ह्यांनी केले. तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ पराग पाटील ह्यांनी कॅम्पस प्लेसमेंट करिता मार्गदर्शन केले.

ह्यावेळी सेवासंवर्धन संस्थेचे संचालक हेमंत भिडे व प्रतिक चौधरी उपस्थित होते. सदर मेगा नौकरी भरती कार्यक्रमास शासकीय अभियांत्रिकी महाविद्याल जळगाव, शासकीय तंत्रनिकेतन जळगाव, शासकीय तंत्रनिकेतन नंदुरबार, केसीई तंत्रनिकेतन, एसएसबीटी, बांभोरी, गोदावरी फौंडेशनचे तंत्रनिकेतन, जळगावच्या एकूण १०० चे वर विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव चे प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी डॉ आशिष विखार, प्रा. जय पंडित व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी महेश सदावर्ते ह्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here