Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»गेल्या तीन वर्षात बेरोजगारीमुळे 10 हजार आत्महत्त्या
    राष्ट्रीय

    गेल्या तीन वर्षात बेरोजगारीमुळे 10 हजार आत्महत्त्या

    saimat teamBy saimat teamFebruary 11, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवीदिल्ली ः  वृत्तसंस्था । गेल्या तीन वर्षांत सुमारे 10 हजार लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या असल्याची माहिती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. केंद्र सरकारच्या या उत्तरानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलेच घेरले. दरम्यान, भाजपा खासदाराने गुरुवारी राज्यसभेत अंबानी आणि अदानी यांची पूजा करावी असे म्हटले आहे. कारण ते लोकांना नोकऱ्या देत आहेत.
    बेरोजगारीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये  काल जोरदार वादावादी झाली. त्यावेळी भाजपा खासदार केजे अल्फोन्स यांंनी चर्चेत भाग घेत हे वक्तव्य केले आहे. “तुम्ही माझ्यावर भांंडवलदारांचे मुखपत्र असल्याचा आरोप करू शकता. मी अशा
    लोकांंची नावे घेतो ज्यांंनी या देशात नोकऱ्या निर्माण केल्या आहेत कारण तुम्ही सुद्धा त्या लोकांंची नावेही घेतली आहेत. रिलायन्स असो, अंबानी असो, अदानी असो,  कोणीही असो, त्यांची पूजा केली पाहिजे. कारण त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात. हे लोक पैसे गुंतवतात, मग ते अंबानी असोत की अदानी, या देशात पैसा कमावणारा प्रत्येक उद्योगपती रोजगार निर्माण करतो. त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आदर करणे आवश्‍्यक आहे,” असे खासदार अल्फोन्स यांंनी म्हटले.
    “जागतिक असमानता ही वस्तुस्थिती आहे. दोन जणांच्या संंपत्तीत वाढ झाल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. एलॉन मस्कच्या संपत्तीत 1016 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तुम्हाला याची जाणीव होती का? गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांच्या संपत्तीतही 126 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बेझोस यांच्या संपत्तीतही 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्व टॉप 10 मध्ये बिल गेट्स सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती केवळ 30 टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक विषमता ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही ती स्वीकारा किंवा नाही. जगातील तीन अब्ज लोक दिवसाला पाच डॉलरपेक्षाही कमी पैशामध्ये आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे जागतिक असमानता ही वस्तुस्थिती आहे,” असेही केजे अल्फोन्स यांनीही यावेळी सांगितले.
    कोणाला अमृत तर कोणाला विष
    दरम्यान, अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान आरजेडी खासदार मनोज कुमार झा यांनी सरकारवर निशाणा साधत सरकारने याला अमर काळातील अर्थसंकल्प म्हटले आहे. “गेल्या काही वर्षातील या सरकारची कार्यशैली पाहिल्यावर कोणाला अमृत मिळतंय आणि कोणाला विष मिळतंय हे स्पष्ट होते. अमृत सरकारच्या मित्रांसाठी आहे आणि पुरेसा पुरवठा आहे, पण बहुतेकांना फक्त विषच मिळत आहे,” असे झा यांनी म्हटले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    PM Narendra Modi : ‘विकसित भारताचे खरे शिल्पकार तरुणच’; VBYLD समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम संदेश

    January 13, 2026

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.