जळगाव : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ वेस्ट आयोजित रोटरी प्रीमियर लीगच्या तिसर्या पर्वात जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी डॉ. राजेश पाटील यांच्या गोलंदाजीवर फलंदाजी करून स्पर्धेचा प्रारंभ केला.
सामाजिक प्रकल्पाच्या निधी उभारणीसाठी हा सामना आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यास रामानंदनगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर, माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, डिस्ट्रिक्ट स्पोर्टस कमिटी चेअरमन अॅड.सुरज जहाँगीर, सहप्रांतपाल डॉ.अपर्णा मकासरे,गनी मेमन,डॉ.तुषार फिरके, वेस्टचे अध्यक्ष तुषार चित्ते,मानद सचिव केकल पटेल, प्रेसिडेंट एन्क्ल्यू संगिता पाटील, डॉ.राजेश पाटील, महेश सोनी, ललित मणियार, अतुल कोगटा आदींसह सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष व मानद सचिवांची प्रमुख उपस्थिती होती. सरिता खाचणे यांनी सूत्रसंचालन केले.
मॅन ऑफ द मॅचचा सन्मान
स्पर्धेतील ११ सामन्यांमध्ये डॉ. विनोद पवार,रविंद्र छाजेड, डॉ. पंकज गुर्जर,अॅड. सागर चित्रे, सचिन बेहेडे, कपिल शहा, सचिन पटेल, पुनीत रावलानी, रुपेश पाटील यांनी मॅन ऑफ द मॅचचा सन्मान मिळवला.रोहित तलरेजा याने दोन सामन्यात दोन वेळा सामनावीराचा बहुमान प्राप्त केला.रविवारपर्यंत सकाळी ८.३० ते रात्री ९.३० या वेळेत दिवस-रात्र पद्धतीने हे सामने खेळले जाणार असल्याचे सांगण्यात आले.आज शनिवारी सायंकाळी ५ ते ६.३० दरम्यान महिलांचा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे.
यांची चमकदार कामगिरी
रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आयोजित सागर पार्कवर रोटरी प्रीमियर लीगचे क्रिकेट सामने सुरू असून वेस्ट
रॉयल किंग संघाचा कर्णधार सचिन पटेलने २५ चेंडूत नाबाद १०२ धावा काढीत शतक झळकविले तर याच संघाकडून अॅड.सुरज जहाँगीर यांनी आरसी डार्क हॉर्सेस संघाचे तीन फलंदाज बाद करुन स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रीक केली. पंच व
गुणलेखक म्हणून मयुर सोनवणे, सुजीत चव्हाणके, अभिजित पाटील (सर्व नाशिक) तर समालोचक म्हणून ज्ञानेश्वर नरवडे (औरंगाबाद) व अय्याज मोहसीन काम पाहत आहे.