चाळीसगाव, प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार,मा खासदार श्रीकांतजी शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य मा.मंगेशजी चिवटे साहेब यांच्या हस्ते साहेबराव काळे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव उपजिल्हा प्रमुख या पदावर निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
त्याप्रसंगी कार्यक्रमास शिवसेना उपनेत्या अभिनेत्री दिपाली सैय्यद,आमदार.अमोल मिटकरी,अभिनेता कुशल बद्रिके,जिल्हा संपर्क प्रमुख वैद्यकीय आघाड़ी जितेंद्र गवळी,जिल्हाप्रमुख वैद्यकीय आघाड़ी डाॅ मोईज देशपांडे,मुराद पटेल,ज्ञानेश्वर ठाकरे ,राहुल पाटील, सागर चौधरी,सागर जाधव, सचिन फुलवारी,मनिष सैदाणे आदी उपस्थित होते. चाळीसगाव तालुका जिल्ह्यातील नागरिकांनी साहेबराव काळे यांचे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे