इकरा उर्दू डीएल ईडी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार

0
31

जळगांव , प्रतिनिधी । येथील इकरा एज्युकेशन सोसायटी द्वारे संचलित ‘इकरा उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन ‘ तर्फे D.L.ED. च्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षात लक्षणीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांच्या अध्यक्षतेखाली जवेरिया युसूफ खान यांनी कुराण पठन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

प्राचार्या सईदा वकील यांनी परीक्षेच्या निकालाची माहिती दिली. शेख नबिला मुख्तार 94.35 प्रथम, शेख इरम अफजल 93.10 द्वितीय, काझी महेवश फातिमा मुजम्मिलोद्दीन 92.95 तृतीय,. तसेच प्रथम वर्षा मध्ये शेख शाइमा मरियम उस्मान 88.50% प्रथम, बुशरा परवीन हारून रशीद 87.60% द्वितीय, उंबरीन शेख सलीम 85.30 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

यावेळी अब्दुल रशीद शेख, (चेअरमन डी.एल.एड कॉलेज ), एस.एम.जफर (चेअरमन -इकरा उर्दू हायस्कूल ) यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी सांगितले की, शिक्षकांनी आपल्या पदाचे पावित्र्य राखून जबाबदारी पार पाडावी .

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रफिक शेख तसेच वसीम अख्तर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी , शिक्षक व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here