सातपूरच्या कारखान्यात भीषण अग्नितांडव, पहिला मजला जळून खाक

0
15

सातपूर, वृत्तसंस्था । येथील औद्योगिक वसाहतीतल्या निलराज कारखान्यात (Nilraj factory) आज (दि. ०२) बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत पहिला मजला जळून खाक झाला आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कुठलीही जीवित हानी झाली नाही. आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या अग्निशमन दलास (Municipal fire brigade) संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाचे ०३ बंब, एमआयडीसीचा (MIDC) ०१ बंब, महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा (Mahindra and Mahindra Company) ०१ बंबासह इतरही बंब घटनास्थळी दाखल झाले.
महापालिकेच्या कर्मचार्‍यांसह एकूण २५ जणांनी मिळून ही आग विझवली. या घटनेत कंपनीचा पहिला मजला जळून खाक झाला आहे. आगीत कॅपॅसिटर (capacitor) बसवण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा कच्चा माल जळाल्याचे समजते.

आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच
दरम्यान, निलराज इंडस्ट्रीमध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली की आणखी कशामुळे याचा शोध सुरू आहे. मात्र, आगीत कसलिही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे कंपनी प्रशासन आणि महापालिका प्रशासनानानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. पहाटे लागलेली आग सकाळी बराच वेळ भडकत होती. साधरणतः दहा वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. ही घटना कंपनीतील कामगार असताना घडली असती, तर मोठा अनर्थ ओढावला असता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here