गुन्हेगारी करण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांकडून गावठी कट्टा जप्त

0
15

भुसावळ, प्रतिनिधी । गुन्हेगारी करण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन जणांकडून बाजारपेठ पोलिसांनी गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळातील वांजोळा रोड भागात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने कारवाई करून तिघांना अटक केली. काही संशयित पिस्तूल बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने सापळा रचून केलेल्या कारवाईत तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे दोन्ही भाऊ व विजय संजय निकम (रा.चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. या तिघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, ३० हजारांची दुचाकी (एमएच.१९-डीसी.८८६०) जप्त करण्यात आली. पोलिस नाईक नीलेश चौधरी यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश गोंटला, गणेश धुमाळ, हरीष भोये, उपनिरीक्षक महेश घायतड, रमण सुरळकर, नीलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार आदींनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here