आमदार चंद्रकांत पाटिल यांचा नाडगांव ते बोदवड रिक्षाने प्रवास

0
11

बोदवड, प्रतिनिधी । तालुक्यातील नाडगांव रेल्वे गेट शनिवारच्या दिवशी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरणे नित्याचेच झाले आहे. जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी शिरसाळा मारोती येथे येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. अश्यातच ; रेल्वे गेट प्रत्येकी अर्धा तास विलंबाने ऊघडत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात.

या पार्श्वभूमिवर आमदार चंद्रकांतभाऊ पाटील मुक्ताईनगरहून बोदवड कडे येत असतांना रेल्वे गेट बंद होते. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. तद्नंतर दहा पंधरा मिनिटांनंतर गेट उघडत असल्याने वाहनांची कोंडी होत होती. त्यामुळे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील रस्त्यावर उतरत त्यांनी ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत केली. त्यानंतर , स्वतःचे खाजगी वाहन रांगेत अडकले असल्याने नियोजित कार्यक्रमाला ऊशीर झाल्याने रेल्वे क्रॉसिंग करत गेटच्या दुसर्या बाजुने रिक्षात बसून बोदवड कडे प्रवास केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here