मुंबई : प्रतिनिधी
सध्या राज्यात तिसऱ्या मंंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीला सुरूवात झाली आहे.या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गटातील अनेक आमदारांंची नावे चर्चेत आहेत पण दोन्ही मंत्रिमंडळ विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांंची संधी हुकली आहे. दुसऱ्या मंत्रिमंंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेल्या ९ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यामुळे भरत गोगावलेंवर अन्याय झाल्याची चर्चा रंगलेली असताना यावर आ.भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण करतांना आपल्यासह शिंदे गटातील व भाजपा आमदारांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
“राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊ नये हे आमचे आणि भाजपाच्या आमदारांचे मत झाले पण, पुढच्या राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडले आहे, असे भरत गोगावले यांनी सांगितले.ते एका मराठी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते. भरत गोगावले पुढे म्हणाले की, “शिवरायांच्या विचाराने चालणारा मी कार्यकर्ता आहे. ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’, त्याप्रमाणे आम्हाला जाणीव झाली की, एकनाथ शिंदे अडचणीत आले तर आमच्या आमदारकीचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित केला.
देवीला साकडे घातले आहे
राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रिपद मिळाल्याने अन्याय झाला? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची गरज नव्हती? असे प्रश्न विचारल्यावर भरत गोगावलेंनी स्पष्ट केले की, “हे आमचे आणि भाजपाच्या आमदारांचे मत झाले पण, भविष्यातील राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडले, हे आम्ही समजून घेतले आहे. अजून १४ मंत्रिपद आहे यासाठी देवीला साकडे घातले आहे.