भडगावच्या लोक अदालतीत ६३ वाद निकाली
भडगाव (प्रतिनिधी)-
दिवाणी व फौजदारी न्यायालय भडगाव येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार, तालुका विधी सेवा समिती भडगाव आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकन्यायालय प्रक्रिया पार पडली. या लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी तसेच वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवण्यावर भर देण्यात आला. ६३ वाद निकाली निघाले.
या लोकन्यायालयात 28 प्रलंबित आणि 35 वादपूर्व प्रकरणे असा एकूण 63 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ४४ लाख १३० रुपये रकमेची तडजोड करण्यात आली. लोक अदालतीच्या पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती व्ही. एस. मोरे (दिवाणी न्यायाधीश, क स्तर) आणि पॅनल सदस्य म्हणून प्रा. वि. राजळे (दिवाणी न्यायाधीश) आणि ऍड. व्ही. आर. महाजन यांनी काम पाहिले.
भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड. बी. आर. पाटील, उपाध्यक्ष ऍड. बी. टी. अहिरे, सचिव ऍड. बी. आर. ठाकरे तसेच ऍड. आर. के. वाणी, ऍड. के. टी. पाटील, ऍड. पी. के. जयस्वाल, ऍड. एच. ए. कुलकर्णी, ऍड. ए. डी. बाग, ऍड. पी. बी. तिवारी, ऍड. एन. जे. तिवारी, ऍड. एम. बी. पाटील, ऍड. एस. आर. सोनवणे, सरकारी अभियोक्ता आय. ए. रंगरेज, पीएसआय रमण कंडारे, तालुका विधी सेवा समिती भडगावचे सहाय्यक अधीक्षक बी. ए. बारी, वरिष्ठ लिपिक एस. एस. रानडे, एन. एम. पाटील, दीपक पाटील, रमेश चव्हाण, अभिजीत दायमा, होतीलाल पाटील, अनिल गोधने, संदीप परदेशी, प्रकाश सोनवणे, जगदीश वाडीले, नितीन कदम आदी उपस्थित होते. न्यायालयीन कर्मचारी, बँकांचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनीही लोकन्यायालयाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.