पुणे : प्रतिनिधी
सनी स्पोर्ट्स किंग्डम सोमेश्वर फाऊंडेशनच्यावतीने माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ ५७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा ४ ऑगस्ट २०२३ पासून सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथे सुरु झाली आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने व क्रीडा जागृती यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेत १५ जिल्ह्यातील एकंंदर ४३६ खेळाडूंनी भाग घेतला असून विद्यमान विश्वविजेता संदीप दिवे, माजी विश्व विजेते प्रशांत मोरे व योगेश परदेशी यांचा यात समावेश आहे. शिवाय पुरुष गटात आंतर राष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकर, महम्मद घुफ्रान, अभिजित त्रीपनकर, अनिल मुंढे, राष्ट्रीय विजेता योगेश धोंगडे तर महिला गटात आंतर राष्ट्रीय कॅरमपटू काजल कुमारी, ऐशा साजिद खान, संगीता चांदोरकर आदी खेळाडूंचा खेळ रंजक ठरणार आहे.
पुरुष सांघिक गटात १५ तर महिला सांघिक गटात ६ संघ सहभागी झाले आहेत. पुरुष एकेरीत गटात २९२, महिला एकेरी गटात ५६,पुरुष वयस्कर एकेरी गटात ७२ व महिला वयस्कर एकेरी गटात १६ महिलांचा सहभाग लाभलेला आहे. ७ ऑगस्टपर्यंत या स्पर्धा रंगणार आहे.
स्पर्धेतील मानांकने :
पुरुष एकेरी – १) प्रशांत मोरे (मुंबई),२) महम्मद घुफ्रान (मुंबई), ३) झैदी फारुकी (ठाणे), ४) संदीप दिवे (मुंबई उपनगर), ५) पंकज पवार (मुंबई), ६) योगेश धोंगडे (मुंबई), ७) योगेश परदेशी (पुणे), ८) सिद्धांत वाडवलकर (मुंबई) महिला एकेरी : १) आकांक्षा कदम (रत्नागिरी), २) ऐशा साजिद खान (मुंबई), ३) काजल कुमारी (मुंबई), ४) अंबिका हरिथ (मुंबई), ५) मिताली पाठक (मुंबई), ६) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ७) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ८) प्रीति खेडेकर (मुंबई)
पुरुष वयस्कर एकेरी : १) फय्याज शेख (पुणे), २) शब्बीर खान (मुंबई उपनगर), ३) बाबुलाल श्रीमल (मुंबई उपनगर), ४) गिरीधर भोज (पालघर). महिला वयस्कर एकेरी : १) शोभा कमर (कोल्हापूर), २) रोझिना गोदाद (मुंबई), माधुरी तायशेटे (मुंबई उपनगर), मीनल लेले खरे (ठाणे). पुरुष सांघिक गट : १) मुंबई, २) पुणे, ३) रत्नागिरी, ४) ठाणे,महिला सांघिक गट : १) मुंबई, २) पुणे.