कन्नडच्या दरीत कार कोसळून मालेगावचे ४ ठार, ७ जखमी

0
58

चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी मध्यरात्री नंतर कार दरीत कोसळून चौघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. धुके आणि अंधाराचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार दरीत कोसळली. जखमींना तातडीने चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांत पती-पत्नी, आठ वर्षांच्या मुलीसह एका महिलेचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील भाविक मोटारीने दर्शनासाठी गेले होते. तेथून ते परत येत असताना कन्नड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मोटारीला अपघात झाला. अपघातील मृतः
या अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के (वय६५),शिलाबाई प्रकाश शिर्के (वय६०),वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५), पूर्वा गणेश देशमुख (वय८) या चार जणांचा मृत्यू झाला. तर अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय१७), सिध्देश पुरुषोत्तम पवार (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय ४), रुपाली गणेश देशमुख (वय ३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५ ) हे सात जण जखमी झाले आहेत.
या अपघातात बचावलेल्या मुलाने प्रसंगावधान राखत घटनेची माहिती दिली. तसेच मंत्री दादा भूसेंनी रात्री १ वाजता आमदार मंगेश चव्हाण यांना कळवले. त्यानंतर आमदार चव्हाण यांच्या टीमसह महामार्ग, ग्रामीण व शहर पोलिसांसोबतच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाग्रास्तांना खोल दरीतून वर काढले. रात्री घाटात प्रचंड धुके होते. पाऊसही असल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण झाला होता.
याप्रकरणी चाळीसगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते चार पथके तयार करुन जखमींना मदत केली .

असा झाला अपघातः
जानेवाडी ता.मालेगाव येथील काही भाविक खासगी वाहनाने गाडी क्र. एमएच ४१ व्ही ४८१६ ने अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते. ते औरंगाबादहून कन्नडघाटमार्गे चाळीसगावकडे येत असतांना घाटमार्ग संपण्याच्या एक किमी अगोदर हा अपघात घडला. गाडीचा चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) हा काचेवर धुक्यामुळे आलेली वाफ कापडाने पुसत असतांनाच त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले. यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. रविवारी घाटात पाऊस व वादळीवा-यासह धुकेही होते. काही ठिकाणी दरडीही कोसळल्या आहेत. पोलिसांनी घाटात वाहने सावकाश व सावधानतेने चालविण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here