३५६ उन्हाळी विशेष रेल्वे धावणार

0
19

३५६ उन्हाळी विशेष रेल्वे धावणार

जळगाव ( प्रतिनिधी)-

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं ३५६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यापैकी काही गाड्यांना जळगाव आणि भुसावळला थांबा आहे.

पुणे-नागपूर एसी विशेष गाडीच्या २४ फेऱ्या, पुणे-नागपूर सुपरफास्ट गाडीच्या २४ फेऱ्या आणि दौंड-कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडीच्या १८० फेऱ्या नियोजित आहेत. या विशेष गाड्यांचे आरक्षण २४ मार्चपासून सुरू होणार आहे.

गाडी क्रमांक 01469 ही साप्ताहिक विशेष गाडी पुणे येथून दर मंगळवारी दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता नागपूरला पोहचेल. गाडी क्रमांक 01470 ही वातानुकूलित विशेष गाडी नागपूरमधून दर बुधवारी सकाळी 8 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पुणे येथे पोहचेल. पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्यांच्या 24 फेऱ्या होणार आहेत.

गाडी क्रमांक 01467 ही गाडी 9 एप्रिल ते 29 जूनदरम्यान दर बुधवारी पुण्यातून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 09468 साप्ताहिक विशेष 10 एप्रिल ते 26 जून दरमान दर गुरुवारी सकाळी 8 वाजता नागपूर येथून सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पोहचेल. पुणे-नागपूर उन्हाळा स्पेशल गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव थांबे असतील.

ट्रेन क्रमांक ०२१३९ सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी ६ एप्रिल ते २९ जूनदरम्यान दर मंगळवारी आणि रविवारी धावणार आहे. ही गाडी सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०२१४० नागपूर-सीएसएमटी विशेष गाडी नागपूरहून रात्री ८.०० वाजता निघून दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील.

ट्रेन क्रमांक ०११५१ सीएसएमटी-करमाळी विशेष गाडी १० एप्रिल ते ५ जून या कालावधीत दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता करमाळीला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११५२ करमाळी- सीएसएमटी विशेष गाडी करमाळीहून दुपारी १.१५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी रात्री ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी येथे थांबे दिले आहेत.

ट्रेन क्रमांक ०११२९ एलटीटी-करमाळी विशेष गाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी एलटीटीहून रात्री १०.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १२.०० वाजता करमाळीला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११३० करमाळीहून दुपारी २.३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी येथे थांबे आहेत.

ट्रेन क्रमांक ०१०६३ एलटीटी-तिरुवनंतपुरम विशेष गाडी ३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत दर गुरुवारी एलटीटीहून दुपारी ४.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता तिरुवनंतपुरमला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरमहून ५ एप्रिल ते ३१ मेपर्यंत दर शनिवारी दुपारी ४.२० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी रात्री १२.४५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीला मडगाव, करवार, उडुपी, मंगळुरु, कन्नूर, कोट्टायम, एर्नाकुलम, तिरुवल्ला आदी थांबे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here