शिवरे गावात २९ मजूरांना पाण्यातून विषबाधा

0
10

जळगाव : प्रतिनिधी

पारोळा तालुक्यातील शिवरे गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रूग्णांवर पारोळा कॉटेज रूग्णालय यशस्वी उपचार सुरू आहेत. सर्व रूग्णांची प्रकृती चांगली आहे.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. रूग्णांवर तात्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा गटविकास अधिकारी किशोर शिंदे व तालुका गटविकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना तात्काळ सूचना निर्गमित केल्या.
घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे घटनास्थळी पोहचत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवरे गावात मध्यप्रदेशहून शेतमजूरीसाठी आलेल्या या २९ जणांनी शेतातील एका ड्रममध्ये अनेक दिवसापासून साचलेले पाणी पिल्याने विषबाधा झाली असावी असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. २९ जणांपैकी २ जणांवर तामसवाडी आरोग्य केंद्रावर उपचार चालू आहेत.
तालुका आरोग्य अधिकारीसह गटविकास अधिकारी कॉटेज हॉस्पिटल येथे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गावातील पाणी नमुने आरोग्य सेवकांनी घेतले आहेत.आमदार चिमणराव पाटील यांनीही रूग्णालयात रूग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे.
विषबाधीतांची नावे
विक्रम पावरा, लोटन पावरा, मिथुन पावरा, कैलास पावरा, नाव्या पावरा, हेमा पावरा, प्रमिला पावरा, गिता पावरा, रेला पावरा, करीना पावरा, अंजली पावरा, नविता पावरा, दिदी पावरा, अंजना पावरा, ईश्वर पावरा, रविना पावरा, सविता काळसिंग पावरा, राधीका पावरा, फिरका पावरा, अजय पावरा, हिना पावरा, सविता रहिंजा पावरा, सुरेखा पावरा, पूजा पावरा, रूचिका पावरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here