पुणे : येथील चांदणी चौकातील पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थिती होती. चांदणी चौकातील या भव्यदिव्य पुलासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी म्हणाले, “पुण्यासाठी ४० हजार कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पुण्यात आता डबल इंजिन लागले आहे. एक दादा होते, आता दोन दादा झाले आहेत. त्यामुळे दोघांनी मनात आणलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा विकास होणारच आहे. पुण्याला पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.