Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»आशिया चषकासाठी टीम इंडियात १५ ऐवजी १७ खेळाडूंची होणार निवड
    क्रीडा

    आशिया चषकासाठी टीम इंडियात १५ ऐवजी १७ खेळाडूंची होणार निवड

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समिती एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सर्व संभाव्य पर्यायांची तपासणी करण्यासाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आज २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्य निवडकर्ता म्हणून आगरकर यांचा हा पहिलाच माध्यमांशी संवाद असेल. ते आशिया चषकासाठी संघाची घोषणा करणार आहे. याआधी सकाळी निवडकर्त्यांची बैठक होणार आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील सहभागी होणार आहेत.
    आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात अशाच खेळाडूंचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे जे आगामी विश्वचषक संघाच्या कल्पनेचा भाग आहेत.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बीसीसीआय आशिया कपसाठी १५ नव्हे तर १७ सदस्यीय संघ निवडणार आहे. त्यामुळे बुमराहचा संघात प्रवेश निश्चित असल्याचे मानले जात आहे.या बैठकीत उपकर्णधाराबाबतही चर्चा होणार आहे.जसप्रीत बुमराह किंवा हार्दिक पांड्या उपकर्णधार बनू शकतात.दोघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले आहे.
    आशिया चषक संघात तिलक वर्माचा समावेश केला जाऊ शकतो.बैठकीत त्यांच्या नावावर चर्चा होणार आहे. आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विंडीजविरुद्धच्या ५ सामन्यात १७३ धावा करत तिलक वर्माने प्रभावित केले.केएल राहुलबद्दल असे म्हटले जात आहे की, तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि आशिया कपमध्ये पुनरागमन करण्यास तयार आहे.त्याच्यासोबत श्रेयस अय्यरही एनसीएमध्ये रिहॅब करत आहे.दोघांनी यापूर्वी एनसीएमध्ये एक सामनाही खेळला होता.
    भारताचा संभाव्य १७ सदस्यीय संघ
    रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल (विकेटकीपर, फिटनेसवर अवलंबून), श्रेयस अय्यर (फिटनेसवर अवलंबून),हार्दिक पंड्या (उपकर्णधार),रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (पर्यायी यष्टिरक्षक),अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, युझवेंद्र चहल किंवा रविचंद्रन अश्विन.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.