ट्रॅक्टरच्या धडकेने १५ वर्षीय मजुराचा मृत्यू

0
30

ट्रॅक्टरच्या धडकेने १५ वर्षीय मजुराचा मृत्यू

पारोळा (प्रतिनिधी)-

शिरसोदे येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने १५ वर्षीय मजुराचा बळी घेतल्याची घटना आज पहाटे तीन वाजता बोरी नदीपात्रात घडली. ट्रॅक्टर रिव्हर्स घेत असताना ट्रॉलीच्या धडकेत हा मजूर जागीच ठार झाला. चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करून चालकाला अटक करण्यात आली आहे.

शिरसोदे (ता. पारोळा) येथील बोरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असताना ट्रॅक्टरची ट्रॉली मागे घेताना १५ वर्षीय गौतम भिल याला धडक बसली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. चालक अजय भिल याने जखमीच्या भावाला माहिती दिली. नंतर बहादरपूर सरकारी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

ट्रॅक्टर चालक अजय भिल आणि ट्रॅक्टर मालक समाधान पाटील (रा. शिरसोदे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला चालकास पोलिसांनी अटक केली आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असून महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी नागरिकांची नाराजी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अवैध वाळू वाहतूक थांबवावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here