14 महिलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

0
17

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत जळगाव शहरातील 14 कुटुंबांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे 2 लाख 80 हजार रुपयांच्या रकमेचे धनादेशांचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते इस्त्राइल केमिकल कंपनीतर्फे जिल्हा रुग्णालयास प्राप्त दहा लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक व्हेन्टिलेटरचे वितरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेकडे करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, समितीचे अध्यक्ष बाळा कंखरे, नगरसेवक नितीन लढ्ढा, तहसीलदार ज्योती देवरे, विष्णू भंगाळे, शरद तायडे, समितीचे अध्यक्ष बाळा कंखरे, शोभा चौधरी, नितीन बरडे, विनोद तराळ, विभागीय व्यवस्थापक पंडित निरपणे, राजीव जाजू, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय अर्थसाहाय्य योजनेच्या माध्यमातून मिळालेली रक्कम मुलांच्या शिक्षणावर खर्च करावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले. तहसीलदार श्रीमती देवरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कंखरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here