Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»रेल्वे मालगाडीच्या डब्याचे सील तोडून खताच्या १२७ गोण्या चोरल्या
    क्राईम

    रेल्वे मालगाडीच्या डब्याचे सील तोडून खताच्या १२७ गोण्या चोरल्या

    Vikas PatilBy Vikas PatilApril 4, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रेल्वे मालगाडीच्या डब्याचे सील तोडून खताच्या १२७ गोण्या चोरल्या

    जळगाव (प्रतिनिधी)-

    जळगाव-सुरत रेल्वे लाइनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून ७८ हजार रुपये किमतीच्या १२७ खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्या. रेल्वेच्या आरपीएफ कार्यालयात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

    रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी मुख्य चोरट्यासह ज्या दोन जणांना खताची विक्री केली, त्यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून खताच्या ७५ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.

    पिंपळकोठा येथील योगेश बडगुजर याने त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने २६ मार्चरोजी रात्री जळगाव-सुरत लाइनवरील मालगाडीच्या डब्याच्या दरवाजाचे सील तोडून खताच्या १२७ गोण्या चोरल्या. बडगुजर याने त्याच्या पिकअप गाडीतून ७५ गोण्या पिंपळकोठा येथे नेल्या. १० गोण्या शेतातील झोपडीत ठेवल्या ३० गोण्या विशाल पाटील नामक व्यक्तीला विक्री केल्या. ३५ गोण्या नातेवाईक लीलाधर बडगुजर याला विक्री केल्या. इतर दोन साथीदार ५७ गोण्या घेऊन पसार झाले.

    रेल्वे सुरक्षा दल सुरत रेल्वे लाइनवर गस्त घालत असताना मालगाडीच्याजवळ खत सांडलेले दिसून आले. त्यांनी डब्याची पाहणी केल्यावर त्यातील १२७ गोण्या चोरी झाल्याचे उघड झाले. योगेश बडगुजर याने त्या चोरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीअंती त्याने चोरीची कबुली देऊन ज्यांना खत विक्री केले त्यांची माहिती दिली. पोलिसांनी विशाल पाटील व लीलाधर बडगुजर यांनाही अटक करून त्यांच्या घरातून व शेतातील झोपडीतून ७५ गोण्या जप्त केल्या. चोरीसाठी मदत करणाऱ्या त्या दोन चोरट्यांचा शोध सुरू आहे.

    ही कारवाई आरपीएफ ज्ञानेश्वर पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक शिवपूजन सिंह, एस. बी. चौधरी, पंकज वाघ, विनोद जेठवे यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Jalgaon:जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर

    March 7, 2026

    Muktainagar: मुक्ताईनगरची कन्या मोहिनी जगताप UPSC मध्ये मिळवते ऐतिहासिक यश

    March 7, 2026

    Jalgaon : जळगावच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ५.९५ लाख उकळले

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.