100, 200 notes : एटीएममधून १०० , २०० च्या नोटा मिळणार

0
12

एटीएममधून १०० , २०० च्या नोटा मिळणार

जळगाव (प्रतिनिधी )

भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याचे निर्देश बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना दिले आहेत.

एटीएममधून आपल्याला ५०० रुपयांच्या नोटा मिळतात. परंतु आपल्याला सुट्टे पैसे हवे असतात. आता यावर रिझर्व्ह बँकेने तोडगा काढला आहे. रिझर्व्ह बँकेने एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याचे निर्देश बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना दिले आहेत.

आरबीआयने परिपत्रक जारी केले आहे आणि त्यात म्हटले आहे की नागरिकांना नोट उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे करणे गरजेचे आहे. एटीएममधून १००, २०० रुपयांच्या नोटा उपलब्ध व्हायला हव्यात.

बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्संना सांगितले की, याची टप्प्याटप्प्याने अंबलबजावणी व्हायला हवी. व्हाईल लेबल एटीएम हे सरकारी आणि खाजगी बँकांसारखेच काम करतात. आरबीआयच्या या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असंही सांगण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here