Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»कर्णधारापेक्षा १० पट मानधन; हैदराबाद संघाचा प्रताप
    क्रीडा

    कर्णधारापेक्षा १० पट मानधन; हैदराबाद संघाचा प्रताप

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हैदराबाद : वृत्तसंस्था

    आयपीएल स्पर्धेेसाठीचा लिलाव काही दिवसांपूर्वी दुबईत आयोजित करण्यात आला होता. या लिलावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीच्या जोडगोळीने विक्रमी कमाई केली. या दोघांसह अनेक खेळाडूंसाठी कोटीच्या कोटी उड्डाणं बोली लावण्यात आली. लिलावानंतर प्रत्येक संघाचे चित्र स्पष्ट झाले आणि असंख्य गमतीजमती समोर आल्या आहेत.
    लिलावानंतर मात्र सनरायझर्सने कर्णधाराची स्थिती केविलवाणी केली आहे. लिलावात सनरायझर्स संघव्यवस्थापनाने तब्बल २० कोटी ५० लाख रुपये खर्चून ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकपविजेता कर्णधार पॅट कमिन्सला ताफ्यात दाखल करुन घेतले. कमिन्सच्या नेतृत्वातच ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, ॲशेस, वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. कर्णधार म्हणून त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. गोलंदाज म्हणूनही त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. कमिन्ससाठी हैदराबादने निम्मी पाऊण तिजोरी खर्च केली. कमिन्स सनरायझर्सचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू असणार आहे. सनरायझर्सचा कर्णधार एडन मारक्रमला २ कोटी ६० लाख रुपये मानधन मिळते. कर्णधाराच्या तुलनेत कमिन्सला १० पट मानधन मिळणार आहे. कमिन्स ऑस्ट्रेलियासाठी टेस्ट आणि वनडे अशा दोन प्रकारात खेळतो. वेगवान गोलंदाज असल्याने त्याला दुखापती होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कमिन्ससाठी वर्कलोड मॅनेजमेंट हा मुद्दा कळीचा ठरतो. खर्च केलेली रक्कम पाहता सनरायझर्स कमिन्सची कर्णधार म्हणून नियुक्ती करु शकते. पण तो सगळे सामने खेळू शकेलच असं नाही. तूर्तास तरी सनरायझर्स कर्णधारपदाबाबत घोषणा केलेली नाही. मानधन यादीनुसार कमिन्स आणि मारक्रम यांच्यादरम्यान ११ खेळाडू आहेत. सोप्या शब्दात सांगायचं तर अंतिम अकरातील सहकाऱ्यांपेक्षा कमी मानधन कर्णधाराला मिळणार आहे.
    २०१५ ते २०२१ या कालावधीसाठी डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. युवा भारतीय खेळाडूंसाठी वॉर्नरचा अनुभव मोलाचा ठरला. आंतरराष्ट्रीय अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडू यांची मोट बांधत वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सने २०१६ मध्ये जेतेपदावर नाव कोरले. सनरायझर्स आणि वॉर्नर हे नातं घट्ट झाले. हैदराबादमध्ये आणि एकूणच देशभरात वॉर्नरचे प्रचंड चाहते आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.