१० मजुरांना चिरडले चार जागीच ठार,सहा गंभीर

0
36

मलकापूर/ बुलढाणा : प्रतिनिधी

नांदुरा-मलकापूर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. चालकाचेंनियंत्रण सुटल्याने एक भरधाव आयशर ट्रक रस्त्यालगतच्या झोपडीत घुसला. ट्रकने झोपडीत झोपलेल्या १० मजुरांना चिरडले असून या अपघातात चार मजूर जागीच ठार झाले आहेत तर ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या सहा जखमींपैकी दोघांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले मजूर हे चिखलदऱ्यातून नांदुऱ्यात रस्त्याच्या कामासाठी आले होते. प्रकाश बाबू जांभेकर (२६), पंकज तुळशीराम जांभेकर (२६), अभिषेक रमेश जांभेकर (१८) अशी अपघातात निधन झालेल्या तीन मजुरांची नावे आहेत. चौथ्या मजुराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्याचे नाव कळू शकलेलेे नाही.

अपघातातील मृत व जखमी
मृतांमध्ये प्रकाश मकु धांडेकर (२६), पंकज तुळशीराम जांबेकर (१९), राजाराम दादूजांबेकर (३५) व अभिषेक रमेश जांबेकर (१८) सर्व रा. मोरगड ता.चिखलदरा, जि. अमरावती या मजुरांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये दीपक पणजी बेलसरे, कमल रमेश जांभेकर, अमर बजू , शाम भास्कर (सर्व. रा. मोरगड) गुणी भुया भोगर रा. बोरीमतोली ता. गढवा) अक्षय कुमार भैय्या (रा. चिनीया ता.गढवा) सतपाल कुमार मलिकचंद (रा.बोरी मातोली) यांचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here