Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»बीड जिल्ह्यातील दोन भीषण अपघातात १० जण ठार
    राज्य

    बीड जिल्ह्यातील दोन भीषण अपघातात १० जण ठार

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 26, 2023Updated:October 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था
    चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव खासगी बस उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे आष्टी फाटा(ता.आष्टी)येथे घडली तर भरधाव रुग्णवाहिका मालमोटारीवर आदळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड अहमदनगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. दोन्ही अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.गुरुवारी पहाटे दोन अपघातांच्या वृत्ताने जिल्हा हादरला आहे.दरम्यान घटनास्थळी आमदार सुरेश धस यांनी भेट देऊन माहिती घेतली असून जखमींना उपचारासाठी पाठविले.
    बीड जिल्ह्यातील अंभोरा(ता.आष्टी)हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ मालमोटार ( क्र. २१ ८६००) हा धामणगाव (ता.आष्टी) कडून अहमदनगर दिशेने जात होता.बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना रुगणवाहिका (क्र. -१६ ९५०७)ने मालमोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे(वय ३५,रा.धामणगाव ता.आष्टी ), मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे( दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी ) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, ( वय ३५, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी ) यांचा अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याच बरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे(वय ४५, रा. घाटा पिंपरी, ता.आष्टी ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
    तर दुसरा अपघात बुधवार दि.२६ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता मुंबईकडून बीडकडे येते असलेल्या सागर ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आष्टा फाटा(ता.आष्टी)येथे नजीक घडला. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.