????????ज्योतिष शास्त्रानुसार महाशिवरात्रि चे महत्व ????????-भाग पहिला -1

0
24

???????? भाग पहिला -1????????

???? नमस्कार मंडळी ????????

????️ आज आपण देवांचे देव महादेव…????️ नवग्रह ज्यांच्या अधीन आहे त्या शिवशम्भो विषयी जाणुन घेऊ या.

???????? माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीस येणारे व्रत म्हणजे महाशिवरात्र होय.तसे म्हटल्यास प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीस शिवरात्र येते पण माघ महिन्यातील शिवरात्रीस विशेष महत्त्व म्हणून तिला “महाशिवरात्र” म्हटले आहे.

???????? ज्याला प्रत्येक सोमवारचा उपवास करणे जमत नाही त्याने किमान श्रावण सोमवारचे उपवास तरी करावेत पण ज्याला हे सुद्धा शक्य नाही त्याने महाशिवरात्रीचा तरी उपवास करावाच.
दिवसभर उपोषण करून प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी केलेली पूजा ही अधिक फलदायी असते.

????यंदा महाशिवरात्र 1 मार्च मंगलवार रोजी आहे.

???????? शंकराला रुद्राभिषेक का करतात….?
रुद्र म्हणजे द्रवणे, माणूस संकटात सापडला म्हणजे त्याला देवाची आठवण येते. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून संततधार धरली जाते, अभिषेक पुरुषसुक्ताने,महिन्माने, रुद्रसूक्ताने करता येतो. लघुरुद्र,महारुद्र,अतिरुद्र हे याचे प्रकार आहे. ज्याला जे शक्य आहे त्या यथाशक्तीनुसार अभिषेक,पूजा कराव्या.

????शनि साडेसातीवर रामबाण उपाय शिवउपासना????

???????? ज्या ज्या महान व्यक्तींना शनीने साडेसातीत सतावून सोडले त्यात भगवान श्रीकृष्ण, लंकाधीपती रावण, प्रभू रामचंद्र, राजा हरिश्चंद्र, राजा विक्रम अशी बरीच नावे आहेत.

????️ शंकर हे महान दैवत देवांचे देव महादेव असल्याने त्यांना शनीने फार त्रस्त केले नाही याचा अर्थ एवढाच की शंकराच्या उपासकांना शनि साडेसातीचा त्रास देत नाही.
अशा प्रकारच्या विचारातून अनेक दोषांवर शिव-उपासना खात्रीशीर पणे परिणाम कारक ठरते.

????️ पत्रिकेनुसार कर्क रास व चंद्र ग्रहाची देवता शिव असून आद्रा नक्षत्राची देवता सुद्धा शिव सांगितली आहे. ज्या वेळी पत्रिकेत चंद्र ग्रह हा बलहिन किंवा पाप ग्रहानी दूषित किंवा अशुभ स्थानामध्ये असता अश्या व्यक्तींना मातृसौख्याची हानी, मानसिक व शारीरिक विकार होण्याची शक्यता असते अश्या वेळी शिव उपासना फायदेशीर ठरते.

☯️ पत्रिकेत बालारिष्ट योग, अल्पायु योग, गंडांतर योग असता रुद्र उपासना तसेच महामृत्यूनंजय जप करावा. हा जप सुर्यास्ता नंतर आणि रात्री केव्हाही करावा.

❇️ चंद्र-शनि युती असेल तर 21 सोमवार 1 नारळ आणि वाटीभर गहू शिवाला वाहणे, 1 मूठ काळी तीळ वाहणे या जोडीला शिवलीला मृतचा 11 वा अध्याय याचे नियमित पठण केल्यास अपमृत्यु व गंडांतर टळतात.

????️ प्रत्येक सोमवारी शिवाला नियमित लाल नागकेशर वाहिल्यास कुबेरासारखी संपत्ती मिळते.

???? कालसर्प शांतीला पर्याय म्हणून शिव उपासना प्रभावी ठरते.
रुद्राभिषेक जल आणि दुधाचा करावा पण उसाच्या रसाचा श्रेष्ठ असतो.

???????? महाशिवरात्रीला निळे कमळाचे फूल सूर्यास्तानंतर किंवा निशीथकालमध्ये अर्पण करावे याच्याने परिवारातील दरिद्री हा शाप कायमचा निघून जातो

???????? निशीथकाल मध्यरात्री 12-24 पासून उत्तर रात्रौ 1-15 पर्यंत आहे या वेळेस केलेली पूजा,जप सर्वश्रेष्ठ समजली जाते.

???? कवठाच (कवीट) नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून भक्षण करावा.

➡️????प्रिय फुले????

रुई,कण्हेर,धोत्रा, निळे कमळ, मंदार,जाई, चाफा,जास्वद,मोगरा.
शिवाला बेलपत्र फारच प्रिय आहे

???? पण चतुर्थी,अष्टमी,नवमी,चतुर्दशी,अमावस्या,संक्रांती, सोमवार या दिवशी बेल तोडू नये, शिव पूजनासाठी बेल मिळाला नाही तर पूर्वी एकदा शिवास अर्पण केलेले बेल पाण्याने धुऊन ते पूजेसाठी पुनः पुन्हा ग्राह्य होते असे स्कंद पुराण सांगते.

????काही समज आणि गैरसमज

????काही पंथामधे शिवास अर्पण केलेले फूल, जल,पत्र, नैवेद्य,फळ ह्या वस्तू प्रसाद म्हणून ग्रहण केल्या जात नाही कारण काही पंथा मध्ये शिव ही तमोगुणी देवता(रुद्र) मानली गेल्यामुळे त्या दृष्टीकोनातून पिंडीवरील वस्तू अग्राह्य ठरतात.

???? दुसरे म्हणजे काही पंथा मध्ये शिवपिंडीस चिताभस्माचे लेपन केले जाते त्यामुळे शिवपिंडीवरील वस्तू अग्राह्य मानल्या जातात त्यांच्या मते शिव हा स्मशानवासी आहे म्हणून स्मशानातील वस्तू घरात आणू नये असा सुद्धा समज आहे.

???? परंतु जेव्हा शिव म्हणजे परमपिता, आदिनाथ,विश्वात्मा व पूर्णब्रह्म असे मानून शिवभक्ती केली जाते त्या वेळी शिवपिंडीवरील वस्तू सर्वथा प्रसादीकच ठरतात.

उपरोक्त नियमांचे पालन करत असतांना टोकाची भूमिका न घेता मनोमन भक्ती आणि आवड ह्या गोष्टी जोपासून शिवपूजा केल्यास भोळा सांबसदाशिव भक्ताची वेडी बागडी पूजा देखील आनंदाने मान्य करून घेतो.

➡️ काही इतर नावे–

???????? अ) शंकर-“शं” करोती इति शंकर:
शं म्हणजे कल्याण व करोती म्हणजे करतो. जो कल्याण करतो तो शंकर होय.

❇️ ब) भालचंद्र- भाळी म्हणजे कपाळी ज्याने चंद्र धारण केला आहे तो भालचंद्र. शिवपुत्र गणपती चे हि नाव भालचंद्र आहे.

☯️ क) कर्पूरगौर- शिवाचा रंग कर्पूर सारखा पांढरा आहे म्हणून त्याला कर्पूरगौर असेही म्हणतात.

????️ सर्व शिव भक्तांना ASTRO SURYA चॅनल तर्फे महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह दोष महादेव नष्ट करो हे बोलून आम्ही आमच्या लेखाला पूर्णविराम देत आहे.

????️ महाशिवरात्रि वर बाकीची माहिती उद्या च्या लेखा मध्ये वांचू या.

???? हिंदू धर्मातील सण, रूढ़ी, परंपरा… नवग्रहाविषयी वाटनारी अनामिक भिति या विषयी समाज मनात जागृती व्हावी हा एक प्रामाणिक उद्देश.

➡️ हा लेख आपल्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकाना पाठवून आपल्या हिंदू धर्मातील सण यांचे महत्व व उपासना त्यांच्या मनात रुजवू या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here