नमस्कार मंडळी ????????
????आज आपण मकर संक्रांतीचे महत्व जाणून घेऊ या
????या वर्षी 14 जानेवारी ला दुपारी 2 वाजुन 28 मिनिटांनी सूर्य नारायण मकर राशीत प्रवेश करीत आहे
????सूर्य त्याचा पुत्र शनी ???????? च्या घरी म्हणजे मकर राशीत प्रवेश करीत आहे… या ठिकाणी सूर्याचा मुक्काम 1 महिना असतो त्यामुळे शनीला फार आनंद होतो
????काही ज्योतिषांचे असे म्हणणे आहे की शनी आणि सूर्य हे शत्रू आहे पण हे सपशेल खोटे आहे, कारण पिता पुत्रा मध्ये मतभेद असू शकतात पण शत्रुत्व नसते
????शनी विषयी पुढच्या लेखात आपण सविस्तर पणे चर्चा करू.. आता फक्त मकर संक्रांती चे महत्व काय त्या विषयी चर्चा करू
????????दिवाळी नंतर लग्नाचे आणि मांगलिक कार्याचे मुहूर्त थोडे फार असतात त्यानंतर मकर संक्रांत नंतर बाकीचे शुभ मुहूर्त असतात
????हिंदू धर्मात महिन्याला 2 विभागात विभागले आहे
1) शुक्ल पक्ष
2) कृष्ण पक्ष
तसेच संपूर्ण वर्षाला 2 विभागात विभागले आहे
1) उत्तरायण
2) दक्षिणायन
उत्तरायणात शुभ कार्य केले जातात
????सूर्य जेव्हा मकर,कुंभ,मीन, मेष, वृषभ,मिथुन या राशीत असतो तेव्हा उत्तरायण असते
आणि सूर्य जेव्हा कर्क,सिह,कन्या,तूळ, वृश्चिक,धनु राशीत असतो तेव्हा दक्षिणायन असते
????मकर संक्रांतीला उपवास चुकूनही करू नये
☘️या दिवशी दुपारी 2 वाजुन 28 मिनिटा नंतर 5 घटिका म्हणजे अंदाजे 2 तास फार पुण्यदायक आहे
????????त्यात सूर्याला अर्घ्य देणे, गायत्री मंत्र, सूर्याचे मंत्र- स्तोत्र जे जे शक्य असेल ते ते करावे
????????नंतर गाईच्या गोवरीच्या तुकड्यावर गुग्गुळ ठेवून त्यावर तिळीचे तेल घालून ते प्रज्वलित करावे व सूर्य देवतेला ओवाळावे
????????या पूजेने शनीची पीडा कमी होते कारण तुम्ही त्याच्या पित्याचा सत्कार करीत आहात
❇️पांढरी तीळ सूर्याची सर्वात जास्त आवडती वस्तू म्हणून त्याचे तेल वापरावे
????आपल्या डोळ्यावर आणि दातावर ????????सूर्याचा प्रभाव असतो म्हणून तिळ खाल्याने दात मजबूत होतात
????मकर संक्रांत ते रथ सप्तमी पर्यंत संक्रातीचा पर्व काळ समजला जातो या मध्ये तीळ दान करण्याचे फार महत्व आहे
????आपण वर्ष भर जेवढी तीळ सेवन करतो तेवढी आपण या वेळी दान करायलाच पाहिजे नाहीतर दोष लागतो
????????तिळाची गाय बनवून ती दान करायला हवी
????????तिळाच्या तेलाचा दिवा शंकराच्या मंदिरात प्रज्वलित करावा
????तीळ आणि तांदूळ याने शिवाचे विधिपूर्वक पूजन करावे
????या दिवशी खिचडी दान करावी
❇️तिळाचे दान,भोजन,हवन करावे
????????तीळ गुळाचा नैवेद्य सूर्याला दाखवून मग भक्षण करावा
????या दिवशी पांढऱ्या तिळीने देवादिकांचे तर्पण तर काळ्या तिळीने पितृ तर्पण करावे
????????या दिवशी शंकराला शुद्ध तुपाचा अभिषेक करावा याने शनी आणि सूर्याची कृपा प्राप्त होते कारण या दोघांनी शंकराला गुरु मानलेले आहे
????या दिवशी तांब्याच्या पात्रात तीळ भरून दान करण्याचे महत्व आहे
कांबळ दान करावे
पाणपोई सुरु करू शकतात
????????या दिवशी सत्यनारायण पूजेचे महत्व आहे
????या दिवशी चवली आणि मुग डाल मिक्स करून भजे ( पकोड़े ) खावे
❇️या दिवशी फेणि खाण फारच शुभ समजले जाते
☘️☘️दर वर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांति अशुभ आहे अश्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात… अश्या प्रकारच्या गोष्टी ला कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे अश्या अफवावर लोकांनी विश्वास ठेवू नये
????हिंदू धर्मातील सण, रूढ़ी, परंपरा… नवग्रहा विषयी वाटनारी अनामिक भिति या विषयी समाज मनात जागृती व्हावी हा एक प्रामाणिक उद्देश
????हा लेख आपल्या जवळच्या मित्रांना आणि नातेवाईक यांना पाठवून आपल्या हिंदू धर्मातील सण यांचे महत्व व उपासना त्यांच्या मनात रुजवू या
????रविंद्र धुप्पड़
ज्योतिष व हस्तरेशा
जळगाव.पुणे.इंदौर. अहमदाबाद नाशीक
मो.9850023712
????????नेहा पटेल
हस्त रेशा, अंक शास्त्र, वनस्पति शास्त्र
पुणे.दिल्ली.मुंबई.जयपुर
????????जय श्रीराम ????????