७६८ शाळा उद्या उघडणार; एका बेंचवर एकच विद्यार्थी

0
52

जळगाव ः प्रतिनिधी
कोरोना संसर्गजन्यस्थिती कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने २३ नोव्हेंबरपासून सुरु होणार्‍या शाळांना १५ दिवसांचा ब्रेक दिला होता.त्यानंतर आता उद्या मंगळवारपासून (दि.८) नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत.जिल्ह्यातील ८५६ पैकी ७६८ शाळांनी शाळा उघडण्यास ना-हरकत असल्याचे पत्र शिक्षण विभागाला दिले तर २ लाख ७ हजार ९५ विद्यार्थापैकी ५२ हजार ५२७ पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवण्याचे संमतीपत्र दिले आहे. शाळा सुरु झाल्यावर ही संख्या वाढणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी दिली.
शाळा सुरु करण्याआधी शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छतेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापनास देण्यात आले आहे. संस्थाचालक,व्यवस्थापन समितीनेही शाळा सुरु करण्यास पाठिंबा दिला आहे. यामुळे मंगळवारी शाळांची घंटा वाजणार असल्याचे आता निश्‍चित झाले आहे.आतापर्यत ९ हजार ६६७ पैकी ९ हजार ३०० शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
अशी असेल आसनव्यवस्था
जे पालक शाळेत पाठवण्यास तयार आहेत, त्यांचे हमीपत्र पाहून त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा. एका वर्गात ६० विद्यार्थी असतील तर एका बाकावर एक असे ३० विद्यार्थी बसवायचे आहेत. अधिक विद्यार्थी असल्यास दोन शिफ्टमध्ये वर्ग भरवावे अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here