Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»४० वर्षीय युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
    क्राईम

    ४० वर्षीय युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

    saimat teamBy saimat teamFebruary 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । ४० वर्षीय युवकाची राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना दि. ७ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    तालुक्यातील तूरखेडा येथील ४० वर्षीय तरूणाने शहरातील कांचन नगर येथे पत्नीच्या घरी दरवाजा बंद करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीला आली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र केशव सुर्यवंशी (वय-४०) रा. तुरखेडा ता. जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. रविंद्र सुर्यवंशी हे मुलगा दिपक सुर्यवंशी यांच्यासह तुरखेडा येथे वास्तव्याला आहे. इमारतीचे बांधकाम करून उदरनिर्वाह करतात. तर पत्नी सुरेखा सुर्यवंशी ह्या जळगाव शहरातील कांचन नगरात वास्तव्याला आहे. त्या भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलगा दिपक हा पत्नी सुरेखाकडे राहण्यासाठी आला होतो. त्यामुळे त्याला घेण्यासाठी रविंद्र सुर्यवंशी हे सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याला घेण्यासाठी कांचन नगर येथील पत्नीच्या घरी आले होते. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पत्नी सुरेखा ह्या कामानिमित्त बाहेर गेले असतांना रविंद्र यांनी घराचा दरवाजा आत बंद करून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. यासंदर्भात पत्नी सुरेखा व मुलगा दिपक हे घरी आले असता दरवाजा आतून बंद होता.

    शेजारचांच्या मदतीने दरवाजा उघडून पाहिले तर रविंद्र सुर्यवंशी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना अभिजित सैंदाणे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.