३१ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन

0
38
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हापेठ व्यायाम शाळा साने गुरुजी वाचनालयाचे बाजूला येथे सकाळी १० वाजता वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेतील प्रथम विजेते आठ पुरुष व महिला यांचा संघ पुढील महिन्यात पालघर येथे होणाऱ्या वरिष्ठ राज्य स्पर्धेत सहभागी होईल. सदर स्पर्धा जागतिक तायक्वांदो संघटनेच्या नियमानुसार होतील जास्तीत जास्त खेळाडूंनी यात स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here