२९ वर्षीय विवाहितेचा अपहरण, एएमआयडीसी पोस्टेत गुन्हा दाखल

0
18

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका भागातील राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेचा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेला शितपेय मध्ये गुंगीचे औषध देवून तिचे अपहरण करत हैद्राबाद येथे तिचे लग्न लावण्यासाठी घेवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर तरुणीला एका घरात दोन दिवस डांबून ठेवले. शहरातील एका भागात राहणारी २९ वर्षीय तरुणीला १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह (रा. नंदा नगर, तुकाराम गेट, उत्तरलाला गुडा, सिकंदराबाद, तेलंगाणा) याने तरुणीला तिच्या राहत्या घरात शितपेयातून गुंगीचे औषध देत बेशुध्द केले. त्यानंतर तशाच अवस्थेत तिला कारमध्ये बसवून थेट हैद्राबादला लग्न लावण्यासाठी घेवून गेला. एव्चेध नव्हे तर, त्याठिकाणी तरूणीला दोन दिवस तिच्या इच्छेविरुध्द घरात डांबून ठेवट मारहाण सुध्दा केली. तसेच तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना मोबाईलद्वारे बदनामी केली.

यानंतर पिडीत तरुणीने संशयित आरोपीच्या तावडीतून सुटून कसे तरी जळगाव गाठले. संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मोहम्मद आरीफ मोहम्मद अमानुउल्लाह याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि अनिस शेख हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here