Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»२३ सायकलपटूंनी पूर्ण केले पाल सायकलिंग चॅलेंज
    क्रीडा

    २३ सायकलपटूंनी पूर्ण केले पाल सायकलिंग चॅलेंज

    saimat teamBy saimat teamFebruary 17, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी
    येथील भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे ‘पाल अल्ट्रा हिल सायकलिंग चॅलेंज’ या १०० व ५० किमी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २३ सायकलपटूंनी यशस्वीपणे हा टप्पा पूर्ण केला. ५० किमीसाठी भुसावळ ते खिरोदा व पुन्हा भुसावळ असा मार्ग होता. तर १०० किमीसाठी भुसावळ-खिरोदा-पाल व त्याचमार्गे परत भुसावळ असा मार्ग होता. सहा सायकलपटूंनी १०० किमी, तर १७ जणांनी ५० किमी टप्पा पूर्ण केला.
    रविवारी सकाळी सहा वाजता डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी डॉ.आंबेडकर मैदानापासून हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली प्रसंगी श्री वाकचौरे यांनी सायकलपटूंनीअवघड अशा मार्गावर सायकल चालवणे आव्हानात्मक असून त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम राबविल्याबद्दल भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनचे अभिनंदन केले. स्पर्धेत ५० किमीसाठी ३ तास ३० मिनिटे तर १०० किमीसाठी ८ तास ३० मिनिटांचा कमाल कालावधी ठरवण्यात आला होता. सर्व सायकलपटूंनी निर्धारित वेळेच्या आत स्पर्धा पूर्ण केली. ही संपूर्ण स्पर्धा विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
    ५० किमी गटात अथर्व शितोळे, भाऊसाहेब पाटील, चंद्रशेखर सोनवणे, चेतनकुमार शाह, दत्तू सपकाळे, जयश्री पाटील, कैलास छाबरा, नितीन साळुंके, नितीन रमानी, प्रकाश अटवाणी, सचिन मनवानी, सीमा पाटील, उमेश घुले, योगेश लुंकड, प्रवीण पाटील, ब्रिजेश लाहोटी, विलास पाटील आदींचा तर, १०० किमी गटात डॉ. महेश फिरके, डॉ. तुषार पाटील, प्रशांत अत्रे, पुनम कुलकर्णी, अ‍ॅड. दिलीप जोनवाल, योगेश पाटील यांचा सहभाग होता.
    सर्व यशस्वी सायकलपटूंना प्रमाणपत्र व पदक प्रदान केले जाईल, अशी माहिती संयोजक प्रवीण पाटील व ब्रिजेश लाहोटी यांनी दिली. पालचा सातपुडा डोंगर पार करणे आव्हानात्मक होते, परंतू भुसावळ रनर्सच्या सदस्यांनी ठिकठिकाणी पाणी व फळांची व्यवस्था केली होती. त्यामुळे ही स्पर्धा सहजपणे पूर्ण करू शकलो असे अ‍ॅड.दिलीप जोनवाल व डॉ. तुषार पाटील यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रिया पाटील व हर्षल लोखंडे, खिरोदा येथे शेख रिजवान व श्रीकांत नगरनाईक तर पाल येथे अजय पाटील व राजेंद्र ठाकूर हे प्रत्येक स्पर्धकाच्या वेळेची नोंद घेत होते. स्पर्धेआधी पूनम भंगाळे यांनी वॉर्मअप घेतले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नीलिमा नेहेते होत्या. यशस्वीतेसाठी छोटू गवळी, रणजित खरारे, स्वाती फालक, चारुलता अजय पाटील, प्रमोद शुक्ला, सरोज शुक्ला यांनी सहकार्य केले.
    या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पुनम कुलकर्णी या महिला सायकलपटूने १०० किमी गटात प्रतिनिधित्व करून ही स्पर्धा सहजपणे पूर्ण केली. तसेच सीमा पाटील व सोनाली पाटील यांनी ५० किमी गटात यशस्वी सहभाग नोंदविला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Kho-Kho Competition : खो-खो स्पर्धेच्या जिल्हा संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर, किरण बोदडे

    December 17, 2025

    Malkapur : शालेय राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत यशोधाम पब्लिक स्कूलच्या

    December 16, 2025

    ‘Fun Activities’ Program : ‘गंमत गोष्टी’ उपक्रमात खेळ, वाचनासह नाट्याची मेजवानी

    December 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.