२२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग, एमआयडीसी पोस्टेत गुन्हा दाखल

0
15
२२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग, एमआयडीसी पोस्टेत गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । २२ वर्षीय विवाहितेचा दांडिया खेळत असतांना धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील २२ वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबीयांसह राहते. 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील रामनगर येथील रहिवासी दया खामकर, बाजीराव खामकर, खंडू देसले, वंदना खामकर, सोनी बाजीराव खामकर, त्रिशा, वैशाली (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी विवाहिता दांडिया खेळत असताना धक्का लागल्याने वरील आठ जणांनी शिवीगाळ करून मारहाण करत विनयभंग केला.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून आठ जणांवर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ फारूक तडवी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here