जळगाव प्रतिनिधी । २० हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडल्याची घटना आज घडली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालयातील महिला दक्षता विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडल्याची घटना आज दुपारी घडली. या कारवाईमुळे पोलीस मुख्यालयात खळबळ उडाली आहे.
संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार असे अटक केलेल्याचे नाव आहे. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या महिला दक्षता समिती कार्यालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार यांनी एका प्रकरणात तक्रार यांच्याकडून २० हजाराची लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करत २० हजाराची लाच घेतांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.