जळगाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षा आतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेला काल शिरपूर व धुळे येथे सुरवात झाली.उत्तर महाराष्ट्र गटात जळगांव व्यतिरिक्त धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्हा संघांचा समावेश आहे.
काल ३ मार्च रोजी जळगांव विरुद्ध नंदूरबार असा सामना शिरपूर येथे खेळला गेला.नंदूरबार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.जळगाव संघाच्या बिनीच्या जोडीने मिळालेल्या संधीचा फायदा घेत पहिल्या गड्यासाठी १०७ धावांची (३१ षटके) विजयी भागीदारी केली व पुढे आपल्या निर्धारीत ५० षटकात केवळ ६ गडी गमावून २०६ धावा केल्या यात सलामीवीर नीरज जोशी ६२धावा (१२०चेंडू) व गोविंद निंभोरे ४५ धावा (८७ चेंडू) तर कर्णधार नचिकेत ठाकूरच्या झंझावाती ३३धावा (३६ चेंडू) तर त्याखालोखाल हर्षवर्धन मालू याच्या १७ व यश सूर्यवंशीच्या १४ धावाचे योगदान होते.
नंंदूरबार संघातर्फे वैभव मराठे याने २ तर आकाश शेलार व तन्मय शहा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला तर जळगावचे दोन फलंदाज धावबाद झाले.
२०७ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या नंदूरबार संघाने सौरव देवरे ४७ धावा, अमोल कोळपे ३६ धावा, व कल्पेश सैदाने २२ धावा यांच्या योगदानासह प्रतिकार केला पण त्यांचे प्रयत्न कमी पडले व त्यांचा संघ ४१ षटकात सर्व गडी बाद १४५ धावा करू शकला व जळगांव संघाला ६१ धावांनी विजय मिळविला
जळगाव संघातर्फे कर्णधार नचिकेत ठाकूर व नीरज जोशी यांंनी प्रत्येकी २ गडी बाद केले,तर यश सुर्यवंशीने एक गडी बाद केला तसेच आशुतोष मालुंजकरने महत्वपूर्ण असे ४ बळी मिळवीत जळगांव संंघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.जळगाव संघाचा सलामी फलंदाज नीरज जोशी हा सामनावीर ठरला. आज ४ मार्च रोजी धुळे विरुद्ध जळगाव असा सामना धुळे येथे होत आहे. जळगाव जिल्ह्याचा क्रिकेट संघ खालील प्रमाणे : नचिकेत ठाकूर (कर्णधार),नीरज जोशी (उप-कर्णधार),आशुतोष मालुंजकर,कुणाल पवार,हर्षवर्धन मालू, गोविंद निंभोरे, एकांत नाईक, जेसल पटेल, भुपेश पाटील, यश सूर्यवंशी, शुभम सोनावणे, श्रीनिवास सिसोदे, ज्ञानदेव सांगोरे, आदित्य चतुर्वेदी, दर्शन खैरनार, प्रसन्न निळे, साहिल गाईकर, लोकेश पाटील, विशाल सोनावणे, तन्वीर अहमद (प्रशिक्षक), सुयश बुरकुल (मुख्य प्रशिक्षक) निवड झालेल्या जळगाव जिल्हा संघाचे अभिनंदन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे, सर्व पदाधिकारी व सदस्यांंनी केले आहे.