१५ हजारांची लाच मागणाऱ्या मारवड पोलीस स्थानकातील हवालदाराला केले जेरबंद

0
25

अमळनेर, प्रतिनिधी । तक्रारदाराकडून विनयभंगाच्या गुन्ह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्यासाठी आज दिनांक २३ रोजी सायंकाळी १५ हजारांची लाच घेताना मारवड पोलीस ठाण्याचा हवालदार भास्कर नामदेव चव्हाण वय ५१ यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमळनेर येथील पोलीस लाईनच्या वसाहतीत राहत्या घरी रंगेहाथ सापळा रचून पकडले असून लागलीच अटक करण्यात आली आहे ,

पथकाने आरोपीस जळगावला नेले आहे ,यामुळे पोलीस खात्यात खडबड उडाली आहे.

मारवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार भास्कर नामदेव चव्हाण यांनी पाडसे येथील ४५ वर्षीय पुरुष तक्रारदार कडून स्वतः , भाऊ व वडिलां विरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात १०५/२०२१ नुसार विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यात मदत करून चार्चशीट कोर्टात लवकर दाखक करण्यासाठीच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाचेची मागणी हवालदार भास्कर चव्हाण यांनी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक अधीक्षक सुनील कडासने,प्रभारी अपर पोलीस अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस उपअधीक्षकशशीकांत श्रीराम पाटील , पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेशपाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर,पोलीस नाईक मनोज जोशी, जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींच्या पथकाने तक्रारदाराची तक्रारीनुसार लाचेची पळताळणी करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात हवालदार भास्कर चव्हाण यांनी तक्रारदारास रक्कम अमळनेर येथील पोलीस वसाहतील राहत्या घरी बोलावून लाचेची रक्कम पंचा समक्ष , व मागितलेल्या लाचेची मागणीची रोख रक्कम आरोपी हवालदार यांनी अमळनेर पोलीस लाईनीतील राहत्या घरी सापळा पथकासमोर स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला असता रंगेहाथ अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here