१५ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांचे साकडे

0
36

जळगाव ः प्रतिनिधी
शासनाकडून जिल्हा परिषदेस मिळणार्‍या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण व्हावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे अधिकार्‍यांना साकडे घातले आहे.
कामे होवूनही निधी अभावी ठेकेदारांना रक्कमेचे वितरण होत नसल्याने पदाधिकारी संतप्त झाले असून उपोषणाचाही पवित्रा पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. यासंबंधीचे निवेदन उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना दिले. जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगातून मिळणारा ६ कोटी ७१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समित्यांना या निधीचे वाटप झाले. यातून विविध कामांना जिल्हा परिषदेने मान्यता दिल्या आहेत. यासह कार्यारंभ आदेश देवून कामे ही पूर्णत्वास आली आहेत. तर १५ दिवसात हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे उपाध्यक्ष लालचंद पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here