१३५ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून दिल्या शुभेच्छा ः ऑक्सिजन सिलेंडर व किट भेट

0
82

जळगाव : प्रतिनिधी
माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल जिल्हा मजूर फेडरेशनच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी आप्पासाहेब गुलाबराव देवकरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.१३५ कार्यकर्त्यांनी याप्रसंगी रक्तदान केले तसेच म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देवकर आप्पांचे कार्यकर्ते खुशाल चव्हाण, सुजीत शिंदे व राजेंद्र पाटील यांनी ऑक्सिजन सिलेंडर व किट सप्रेम भेट दिले.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव देवकर यांनी मजुर फेडरेशनचे संचालक व पदाधिकारी तसेच उपमहापौर सुनिल खडके, अशोक लाडवंजारी, अमित काळे, पिंटू काळे, सचिन पाटील,साईमतचे संपादक प्रमोद बर्‍हाटे, लकी टेलर, ज्ञानेश्वर महाजन, अतुल हाडा, शुचिता हाडा, सुनिल माळी, शरद तायडे, भागवत भंगाळे, सदाशिव ढेकले, डॉ.सुनिल महाजन, शिवराम पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी येऊन भेट दिली व शुभेच्छा दिल्या.
त्यात प्रामुख्याने साईमतचे संपादक प्रमोद बर्‍हाटे,साईमतचे जिल्हा प्रतिनिधी अ‍ॅड.वसंतराव भोलाणे,राष्ट्रवादी जळगाव ग्रंथालय सेलचे अध्यक्ष मोहन पाटील, धरणगावचे माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सामाजिक कार्यकर्ते दिनेश कंखरे, नारायण चौधरी, राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, माजी तालुकाध्यक्ष रमेश आर. पाटील,माजी जि.प.सदस्य रविंद्र भिलाजी पाटील ,युवक अध्यक्ष नारेश्वर पवार, आनंद पाटील व देवरे आबा(धरणगाव),महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे आदींचा समावेश होता.उपक्रम यशस्वीतेसाठी मजूर फेडरेशनचे सभापती लिलाधर तायडे, संचालक पुरुषोत्तम चौधरी, रोहिदास पाटील, अजय सोनवणे मॅनेजर, इंजि. बबलू पाटील तसेच अनिल लोहार यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here