जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल दिनांक ३ फेब्रुवारी रोजी हुतात्मा दिन साजरा करून स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली. महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाष चंद्र बोस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य गणेश पाटील, समन्वयिक स्वाती अहिरराव, सांस्कृतिक विभाग प्रमुख भारती अत्तरदे मुलांच्या हस्ते सरस्वती पूजन व क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. इयत्ता पाचवी पाचवी चे विद्यार्थी मोहक जैन, विनायक शिरोळे, रजत शर्मा, आदित्य चौधरी या विद्यार्थ्यांनी सुभाष चंद्र बोस, सुखदेव, राजगुरू व भगतसिंग यांचे पात्र साकारले व त्यांच्या पात्राचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेचे प्राचार्य गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांविषयी माहिती सांगून त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाची व बलिदानाची उदाहरणे सांगितली. विद्यार्थ्यांनी देखील त्यांना प्रतिसाद देत आपणही देश कार्यासाठी योगदान देऊ अशी खात्री दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणश्री पवार, काव्या पगारे, उत्कर्षा चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन कोथळकर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले