“हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालून दाखवा”

0
58

मुंबई ः प्रतिनिधी । कर्नाटकमधील हिजाब वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत असून आंदोलनं केली जात आहेत. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटलं. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण करणाऱ्या कंगना रणौतने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. कंगना रणौतने इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर केली असून यामध्ये तिने महिला स्विमिंग सूटमध्ये बीचवर बसल्याचा आणि बुरख्यातील असा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “इराण. 1973 आणि आता. पन्नास वर्षात बिकिनीपासून ते बुरख्यापर्यंत.  जे इतिहासापासून धडा घेत नाहीत ते इतिहासाची पुनरावृत्ती करतात”.
कंगनाने हा फोटो कॅप्शनसहित शेअर करताना लिहिले आहे की, “जर तुम्हाला धाडस दाखवायचं असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा न घालून दाखवा. मुक्त होण्यास शिका, स्वत:ला पिंजऱ्यात अडकवू नका”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here